ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलीस स्टेशन परिसरात 53 झाडांचे वृक्षारोपण

पोलिस स्टेशन सावलीचा उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीचे औचित्य साधून पोलिस स्टेशन सावली येथे पोलिस निरीक्षक प्रदीप पूल्लरवार आणि पोलिस उपनिरीक्षक सचिन मुसळे यांचे मार्गदर्शनात पोलिस स्टेशन परिसरात विविध प्रजातीचे ५३ वृक्षांचे रोपण करण्यात आले.

 वृक्षारोपण आणि संवर्धन ही काळाची गरज आहे कारण यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होते आणि हवामान बदलावर नियंत्रण ठेवता येते.वाढत्या औद्योगीकरणामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे आणि त्यामुळे तापमानात वाढ होऊन नैसर्गिक आपत्ती वाढत आहे म्हणून वृक्षारोपण काळाची गरज आहे म्हणून आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पोलिस स्टेशनचे वतीने वृक्षारोपण करण्याचे ठरविण्यात आले.असे मत सावली पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रदीप पूल्लरवार यांनी या प्रसंगी व्यक्त केले

यावेळी सावली नगर पंचायतचे उपाध्यक्ष संदीप पुण्यपकार,नगरसेवक विजय मुत्यालवार,प्रीतम गेडाम,प्रफुल वाळके,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अनिल स्वामी,पत्रकार सुरज बोम्मावार,उदय गडकरी,डॉ.शेखर प्यारमवार, बाबा मेश्राम,आशिष दुधे, उमेश वाळके,लोकमत दुधे,तसेच पोलीस कर्मचारी व शहरातील प्रतिष्ठित नागरिकांनी उपस्थित राहून पोलिस स्टेशन चे ठाणेदार प्रदिप पुल्लरवार यांच्या उपक्रमाचे कौतुक करीत शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये