ताज्या घडामोडी

एकाच युवकावर दुसऱ्यांदा गोळीबार – रघुवंशी कॉम्प्लेक्स मधील घटना

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी
आशिष रैच राजुरा

भर दुपारी झालेल्या रघुवंशी कॉम्प्लेक्स मधिल गोळीबाराच्या घटनेने चंद्रपूर शहरात खळबळ उडाली असुन मनसे कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष असलेल्या अमन गंधेवार नामक युवकावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला असुन काही महिन्यांपूर्वीही ह्याच व्यक्तीवर ह्याच कॉम्प्लेक्स मधे गोळीबार झाला होता हे विशेष.

अमन गंधेवार ह्यांचे रघुवंशी कॉम्प्लेक्स मधे कार्यालय असुन ते दुपारी 2:00 वाजताच्या सुमारास ते आपल्या कार्यालयात येत असतानाच त्यांच्यावर मागुन गोळीबार करण्यात आला. मारेकऱ्यांनी त्यांच्यावर दोन गोळ्या झाडल्याची प्राथमिक माहिती असुन त्यातील एक गोळी त्यांच्या पाठीत लागली असुन दुसरी गोळी त्यांच्या बाजूने निघुन गेली असल्याचे कळले आहे.

घटनेची माहिती होताच शहर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असुन जखमी अमन गंधेवार ह्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांना पुढील उपचारांसाठी नागपूर येथे रवाना करण्यात आले आहे. घटनेनंतर आरोपी पसार हिण्यात यशस्वी ठरले असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मधुन मारेकऱ्यांचा छडा लागण्याची शक्यता आहे.

ह्या घटनेमागे पूर्ववैमन्यास्याची पार्श्वभूमी असल्याचीही चर्चा असुन बल्लारपूर येथिल कोळसा व्यावसायिक सुरज बहुरिया ह्यांची 2020 मधे गोळी झाडून हत्या करण्यात आली होती व त्या घटनेत इतर आरोपींसह अमन गंधेवार ह्यांचा सहभाग असल्याचा आरोप होत होता त्याअनुषंगाने बदला घेण्याच्या उद्देशाने दुसऱ्यांदा त्यांच्यावर हा जीवघेणा हल्ला झाला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये