गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सोन्याची चैन, मोटर सायकलसह एकुण १६ लाख ९० हजारांवर मुद्देमाल जप्त

सोन्याची चैन हिसकावून नेल्याबाबतचा गुन्हा उघड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

    यातील फिर्यादी हा नमूद घटने दिवशी रात्र दरम्यान त्याचे कारमध्ये घराजवळ झोपून असतांना यातील पसार आरोपी नामे – विपिन मानकर, राहणार पूलफैल वर्धा याचे सांगणेवरून आरोपी क्र. 1) पिंटू किसन मानकर, वय 21 वर्ष, रा. सुदर्शन वार्ड क्र. 25 पूलफैल वर्धा, 2) अमित अरुण नाकाडे, वय 22 वर्ष, रा. सुदर्शन वार्ड क्र. 26 पूलफैल वर्धा यांनी फिर्यादीची कार घटनास्थळी घेऊन जाऊन फिर्यादी हा कारमध्ये झोपून असतांना त्याचे गळ्यातील असलेली 215 ग्राम वजनाची सोन्याची चैन लॉकेटसह हिसकावून चोरून नेली. असे फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरुन संशयित आरोपी नामे – 1) विपिन मानकर, 2) पिंट्या मानकर व एक अज्ञात आरोपीतांविरुध्द पोलीस स्टेशन वर्धा (शहर) येथे अपराध क्रमांक 1655/2024 कलम 304(2), 3(5) भारतीय न्याय संहिता 2023 प्रमाणे गुन्हा नोंद करुन तपासावर आहे.

         सदर गुन्हा हा अत्यंत गंभीर स्वरुपाचा असल्याने सदर गुन्हयाचा समांतर तपास स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा हे करीत असतांना गोपनीय माहीतीच्या आधारे आरोपी नामे 1) पिंटू किसन मानकर, वय 21 वर्ष, रा. सुदर्शन वार्ड क्र. 25 पूलफैल वर्धा, 2) अमित अरुण नाकाडे, वय 22 वर्ष, रा. सुदर्शन वार्ड क्र. 26 पूलफैल वर्धा, यांना अत्यंत शिताफीने ताब्यात घेवुन त्यांना गुन्हयाबाबत सखोल विचारपुस केली असता आरोपी नामे विपिन मानकर रा. फुलफैल वर्धा याचे सांगण्यावरून सदर गुन्हा केल्याचे सांगितले.

  सदर गुन्हयातील एकुण 02 ( दोन) आरोपीतांना निष्पन्न करुन त्यांनी गुन्हयातील हिसकावून चोरी केलेले सोन्याची चैन 200 ग्रॅम वजनाची तसेच गुन्हा करणे करीता वापरलेली एकुण 01 वाहन व 02 मोबाईल असा एकुण जु. किंमत 16,90,000/-रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदर आरोपीतांना जप्त मुद्देमालासह पुढील कार्यवाही करीता पोलीस स्टेशन वर्धा (शहर) यांचे ताब्यात देण्यात आले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस स्टेशन वर्धा (शहर) हे करीत आहे.

      सदर कारवाई मा. श्री. अनुराग जैन साहेब, पोलीस अधिक्षक वर्धा, मा. श्री. सागर कवडे साहेब अपर पोलीस अधिक्षक वर्धा, यांचे मार्गदर्शनात – श्री. विनोद चौधरी, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा, पो.उप.नि. अमोल लगड, पो.हवा. चंद्रकांत बुरंगे, गजानन लामसे, महादेव सानप, मनिष कांबळे, रितेश शर्मा, अमोल नगराळे, गोपाल बावनकर, मंगेश आदे, दिपक साठे, सर्व स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये