ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

निवासी अतिक्रमणधारकांच्या न्याय हक्कासाठी एक दिवसीय धरणे आंदोलन

बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे युवा नेते सूर्या शस्त्रकार यांचे पोलिस स्टेशनला निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

हिंगणघाट – नांदगांव सहित इतरही गावात दलीत आदिवासी फासे पारधी समाजातील लोकांनी परिवाराच्या उदरनिर्वाहासाठी शासकीय भूखंडावर निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केले आहे शासनाच्या निर्णयाप्रमाणे व सर्वांसाठी घरे -2 022च्या धोरण नुसार निवासी अतिक्रमणाची नोंद घेऊन नियमाकुल होणे अपेक्षित होते.

परंतु तसे काही झाले नाही म्हणून बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे यांच्या प्रमुख मार्गद्शनाखाली सविधनात्मक पद्धतीने व लोकशाही मार्गाने आंदोलन आयोजित दिनांक 1मार्च 2024केले आहे त्याची माहिती उपविभागीय अधिकारी तहसीलदार गट विकास अधिकारी यांच्या कडे सादर केल्या असून त्याची माहिती पोलिस स्टेशन हिंगनघाट यांना निवेदनद्वारे दिली आहे.

यावेळी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे युवा नेते सूर्या भाई शस्त्रकार यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये