ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चांदा पब्लिक स्कूल येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन

चांदा ब्लास्ट

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्य चांदा पब्लिक स्कूल येथे योग दिवस साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्राचार्या आम्रपाली पडोळे, शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

शारिरिक व मानसिक आरोग्याचे निवारण व्हावे यासाठी नियमित योगासने करणे गरजेचे आहे. नियमित आणि योग्य योगसाधनेमुळे आपली आंतरिक शांती, संवेदनशिलता आणि जागरूकता वाढते. विचार विकसित होतात. मानसिक संतुलन, सकारात्मक दृष्टिकोन असे अनेक फायदे होतात.

योगा अॅन्थमने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. तसेच, अनुलोम-विलोम प्राणायाम सुर्यनमस्कार, ताडासन, वृक्षासन, भुजंगासन, पर्वतासन असे विविध आसन विद्यार्थ्यांसाठी सादर करण्यात आले.

प्राचार्या आम्रपाली पडोळे यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा दिल्या, तसेच विद्यार्थी आपल्या देशाचे भविष्य आहे, सर्वप्रथम त्यांचे स्वास्थ्य जपणे ही आपली प्राथमिकता आहे. वर्तमान स्वस्थ तर भविष्य स्वस्थ राहील म्हणून सर्वांनी स्वतःच्या शरीराची काळजी घेणे आवश्यक आहे असे वक्तव्य केले.

आंतराष्ट्रीय योगदिनाचे महत्व शिक्षिका वंदना बोरसरे यांनी उपस्थित सर्वांना सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूहीना तबस्सुम यांनी केले तर आभार प्रदर्शन जास्मिन हकिम यांनी केले. कार्यक्रम प्रमुख प्रांजली गोवारदिपे तसेच क्रीडा शिक्षक अमर कडपेवाले, रमेश कोडारी, जयंती मड्डेला व सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये