ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गुरुकुल महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

गुरुकुल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नांदा येथे आंतरराष्ट्रीय योग दिन राष्ट्रीय सेवा योजना आणि क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाद्वारे 21 जून ला साजरा करण्यात आला.

याप्रसंगी गुरुकुल महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य व शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा.आशिष पईनकर, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रशांत पुराणिक, डॉ. राजेश डोंगरे, प्रा. सचिन कणॅवार, प्रमोद वाघाडे सर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

प्र. प्राचार्य आशिष पईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी विविध आसने केली. यात प्राणायाम, अनुलोम विलोम, चक्रासन, धनुरासन, भुजंगासन या योग क्रियांचा समावेश होता. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता गुरुकुल महाविद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये