Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

केंद्र आणि राज्य सरकारचे सर्वच घटकांमध्ये अनेक अन्यायकारक निर्णय

उद्या सरकारच्या प्रतिकात्मक प्रतिमेस चिखल लावून, चिखल फेको आंदोलन

चांदा ब्लास्ट

केंद्र आणि राज्य सरकारने अनेक अन्यायकारक निर्णय घेतले आहेत. यामुळे समाजातील सर्वच घटक अनेक समस्यांना तोंड देत आहेत. मात्र, सरकार केवळ बघ्याची भूमिका घेऊन आहे. त्यामुळे चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सरकारचा निषेध नोंदविण्यासाठी चंद्रपूर शहरातील गांधीचे उप येथे शुक्रवार दिनांक 21 जून रोजी सकाळी साडेदहा वाजता सरकारच्या प्रतिकात्मक प्रतिमेस चिखल लावून, चिखल फेको आंदोलन करण्यात येणार आहे.

प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या निर्देशानुसार आयोजित या आंदोलनाला खासदार प्रतिभाताई धानोरकर, जिल्हाध्यक्ष आमदार सुभाषभाऊ धोटे, चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष रितेश उर्फ रामू तिवारी यांची उपस्थिती राहणार आहे. तरी, या आंदोलनाला काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष रितेश उर्फ रामू तिवारी यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये