Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

माहिती तंत्रज्ञानाच्या युगात वाचन संस्कृती जतन करणे महत्वाचे : उध्दव गेडाम

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हायस्कुल येथे फातिमा शेख वाचनालयाचा शुभारंभ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

           सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात संगणकाच्या माध्यमातून विविध माहिती प्राप्त केल्या जात आहे. काळानुरूप हा बदल अपेक्षीत असला तरी याचे प्रतिकुल परीणाम मात्र अधिक दिसून येते. यात योग्य समन्वय असला पाहीजे. पुस्तक वाचन संस्कृतीचा सर्वत्र ऱ्हास होत आहे. यामुळे विद्यार्थांच्या ज्ञान कक्षा अरूंद होत असून त्यांचा बौध्दीक विकासावर सुध्दा परीणाम होतांना दिसतो. यापूर्वी वाचनालयात वाचकांची सारखी वर्दळ असायची परंतु सध्या वाचनालये ओस पडतांना दिसून येते. शालेय, महाविद्यालयीन , स्पर्धा परीक्षेची पुर्वतयारी करणारे, आणि विविध क्षेत्रातील ज्ञान प्राप्त करू इच्छीणारे विद्यार्थी,युवक व युवतींना वाचनालयाची ओढ लावण्यासाठी पुन्हा एकदा माहिती तंत्रज्ञानाच्या युगात वाचन संस्कृती जतन करणे महत्वाचे असल्याचे प्रतिपादन फ्रेंडस एज्युकेशन सोयायटीचे सचिव उध्दव गेडाम यांनी केले.

 स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हायस्कुल येथे दिवंगत दयालजी वाघमारे यांच्या स्मृती प्रित्यर्थ प्रणय वाघमारे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या योगदानातुन सुरु करण्यात आलेल्या थोर शिक्षिका फातिमा शेख वाचनालयाच्या उद्घाटनीय कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून उपस्थितांना मार्गदर्शन करताना फ्रेंडस एज्युकेशन सोयायटीचे सचिव उध्दव गेडाम बोलत होते.

    याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष फ्रेंडस एज्युकेशन सोयायटीचे सचिव उध्दव गेडाम, उद्घाटक सामाजीक कार्यकर्ते मुनाज शेख,फ्रेंडस एज्युकेशन सोयायटीचे संचालक सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रभाकर डोंगरे,फ्रेंडस एज्युकेशन सोयायटीचे संचालक प्रणय वाघमारे, सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक पोमेश्वर टोंगे, मौलवी साहब फारूख रझा, आणि प्राचार्य मिलींद वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे उद्घाटक सामाजिक कार्यकर्ते मुनाज शेख हे होते. याप्रसंगी सेवानिवृत्त मुख्याध्यापक तुळशीराम खैरे व पुष्पा वाघमारे यांची विशेष उपस्थिती होती.

         सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रभाकर डोंगरे यांनी वाघमारे कुटुंबीयांनी स्वयंस्फूर्तीने वाचनालय सुरू करण्याकरिता जे योगदान दिले त्याबद्दल प्रणय वाघमारे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे भरभरून अभिनंदन केले.

 प्रणय वाघमारे याप्रसंगी म्हणाले की, माझे वडील दिवंगत दयालजी वाघमारे यांच्या स्मृती प्रित्यर्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हायस्कूल येथे थोर शिक्षिका ‘फातिमा शेख’ यांच्या नावाने वाचनालय सुरू करून विद्यार्थी आणि युवक युवतींच्या उज्वल भविष्याकरिता कार्य करण्याची संधी मिळाली. यातून आम्हाला सामाजिक ऋण फेडण्याचा अनुभव येत असून सदर वाचनालयाच्या प्रगती करिता निरंतर प्रयत्नशील राहू. या वेळी पुष्पा वाघमारे यांच्याकडून विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य वितरीत करण्यात आले.

       कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य मिलिंद वाघमारे, सुत्रसंचलन कलाशिक्षक विनोद ठमके व आभार प्रदर्शन कैझ शेख यांनी केले. कार्यक्रम आयोजनासाठी शिक्षकवृन्द संदीप पोटे, कैझ शेख, विनोद ठमके, कुंदन नगराळे, युवराज सोनुने, प्रीती रामटेके, दिक्षा जीवने, मनीषा कांबळे, ज्योत्स्ना गायकवाड, रूणाली आमटे, निखत शेख,किरण वानखेडे, निदिया वाळके, दुर्गा चव्हाण, संगीता शेंडे, प्रणिता शेंडे व नितीन वाळके यांनी सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये