Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलीस भरती मैदानी प्रात्यक्षिके प्राकिया

सदर रोडवरची सर्व प्रकारची वाहतूक बंद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

      महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 वे कलम 33 (1) (ब) नुसार सार्वजनिक ठिकाणची रहदारी व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी करावयाच्या नियमनासाठी प्राप्त असलेल्या कायदेशीर अधिकारान्वये वर्धा जिल्हा पोलीस भरती मैदानी प्रात्यक्षिके प्राकिया दि. 19/06/2024 ते दि. 22/06/24 दरम्यान मैदानी प्रात्यक्षिके हे पोलीस कवायत मैदान पोलीस मुख्यालय वर्धा व जिल्हा किडा स्टेडीयम ग्राऊंड येथे घेण्यात येणार आहे.

भरतीच्या कालावधी मध्ये जर पाऊस आला तर 1600 मिटर धावण्याचे प्रात्यक्षिके हे सेवाग्राम उड्डाणपुल ते दत्तपूर टि पॉईंट या बायपास रोड वर घेण्यात येणार आहे. त्यामुळे सदर रोड वरची सर्व प्रकारची वाहतुक ही दि. 19/06/2024 ते दि. 22/06/24 या दिवशीचे सकाळी 04.00 वा ते सायंकाळी 05.00 वा पर्यंत बंद करण्यात येत आहे.

1) सदर बायपास मार्गे होणारी वाहतुक ही दत्तपूर टिपॉईंट कडुन सेवाग्राम कडे दत्तपूर टि पॉईंट – नालवाडी रोड गोपूरी रोड रेस्ट हाऊस गांधी पुतळा- सेवाग्राम उड्डाणपुल मार्गे सेवाग्राम.

2) सदर बायपास मार्गे होणारी वाहतुक ही सेवाग्राम उड्डाणपुल कडुन दत्तपूर टि पॉईंट कडे सेवाग्राम उड्डाणपुल – गांधी पुतळा- रेस्ट हाऊस गोपूरी रोड नालवाडी रोड दत्तपूर टि पॉईंट या प्रामाणे वळविण्यात येत आहे.

वर्धा जिल्हा पोलीस भरती सन 2022-23 प्रकिये दरम्यान वाहतुक व्यवस्थेचा प्रश्न निर्मान होवु नये या करीता सर्व नागरिकांनी वर नमुद मार्गाने वाहना व्दारे प्रवास करणा-या सर्व जनतेने वाहतुक व्यवस्थेचा वापर करावा, शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यास पोलीसांना सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये