Sudarshan Nimkar
गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दारूची अवैध वाहतूक करणाऱ्यावर कार्यवाही

मारुती सियाझ चारचाकी वाहनासह एकूण १२ लाख ८९ हजारांवर देशी-विदेशी दारूसाठा जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक १०/०६/२०२४ रोजी एका चारचाकी गाडी मध्ये अवैधरित्या देशी-विदेशी दारूचा माल भरून अमरावती जिल्हयातुन पुलगाव मार्गे वर्धा शहरात येत असल्याची मुखबीर कडून खात्रीशीर माहिती मा. पोलीस अधीक्षक सा. वर्धा यांचे विशेष पथकास मिळाल्यावरुन विशेष पथकातील अधिकारी व अंमलदार तसेच पोलीस स्टेशन सावंगी (मेघे) येथील पोलीस स्टॉफसह वर्धा ते पुलगाव रोडवरील रेल्वे फाटकाजवळ सापळा रचून नाकेबंदी केली असता एक मारुती सियाझ चारचाकी वाहन क्र. एम.एच.-०४/एच.एम.-७१९१२ हे मिळुन आल्याने सदर वाहनाची झडती घेतली त्यामध्ये ४,०५,४०० रु. चा देशी विदेशी दारूसाठा मिळुन आला असता वाहन चालक नामे योगेश उर्फ सोनु मदनलाल विश्वकर्मा, वय ३३ वर्ष, रा. समता नगर, वर्धा यास ताब्यात घेवुन त्यास विचारपूस केली असता सदरचा दारुसाठा हा त्याने अंकित जयस्वाल रा. वर्धा याचे बारमधुन विकत आणल्याचे सांगीतल्याने वरील वाहनात मिळुन आलेला १) ४,०५,४०० रु. चा देशी विदेशी दारूसाठा, २) आरोपीचे अंगझडतीतील नगदी ४००० रु. ३) एक अप्पल कंपनीचा आयफोन कि. ८०,००० रु. व ४) एक मारुती सियाझ चारचाकी वाहन क्र. एम.एच.-०४/एच.एम.-७९१२ कि. ८,००,००० रु. असा एकुण १२,८९,४०० रु. चा मुद्देमाल जप्त करुन वाहन चालक व बार मालकाविरुध्द पोलीस स्टेशन सावंगी (मेघे) येथे दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. नुरुल हसन, मा. अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कवडे यांचे मार्गदर्शनात पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथकातील सपोनि, मंगेश भोयर, पोलीस स्टेशन सावंगी (मेघे) येथील ठाणेदार सपोनि. संदिप कापडे व विशेष पथकातील पोलीस अंमलदार रोशन निंबोळकर, सागर भोसले, कैलास बालदे, प्रदिप कुचनकर, सुगद चौधरी तसेच पोलीस स्टेशन सावंगी (मेघे) येथील पोलीस स्टॉफ यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये