ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जनता हायस्कूल डेपो शाखा बल्लारपूर या शाळेचा ९४.७४ टक्के निकाल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत रणदिवे

 जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेचा शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२४ लागलेला निकाल ९४.७४ टक्के आहे.

या परीक्षेकरीता एकूण १९ विद्यार्थी बसलेले होते. त्यापैकी प्रथम श्रेणीमध्ये सहा, द्वितीय श्रेणीमध्ये सहा, तृतीय श्रेणीमध्ये सहा विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहे.

गुणानुक्रमे साहिल बाबाराव मेश्राम ७१ टक्के प्रथम, तंजिल आरिफ शेख ६६.६ टक्के द्वितीय आणि कु. कृतिका जगदीश केशकर ६५ टक्के तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

विद्यार्थ्याचे अभिनंदन करण्यामध्ये बी. बी. भगत मुख्याध्यापक,शिक्षक एम. डी. टोंगे, यु. के. रांगणकर वर्गशिक्षक, आर. बी. अलाम, आर. के. वानखेडे, एस. एम. चव्हाण, एस. एन. लोधे, गणेश चंदावार, जगदीश कांबळे, वाल्मीक खोंडे, वामन बोबडे, इंद्रभान अडबाले यांचा समावेश आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये