Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खासदार प्रतापराव जाधव यांच्या विजयासाठी श्री चरणी साकडे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

 बुलढाणा लोकसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून निकालासाठी अवघे काही तास बाकी आहे त्यामुळे राज सत्तेच्या माध्यमातून सतत शेतकरी शेतमजूर व कष्टकरी यांच्या साठी भूमिपुत्र खासदार प्रतापराव जाधव यांच्या विजयासाठी खामगाव ते शेगाव अशी पायदळ वारी करत श्री चरणी शिवसैनिकांनी साकडे घातले.

यावेळी मेहकर मतदार संघाचे आमदार संजय रायमुलकर यांच्या सुविद्य पत्नी रंजनाताई रायमुलकर,शिवसेना उपजिल्हाप्रमुख दीपक बोरकर,शिवसेना युवा नेते योगेश जाधव,तुषार शिपणे,सिंदखेडराजा मतदारसंघ तालुका प्रवक्ता विकास गवई, विभाग प्रमुख विठ्ठल माने, सुभाष सवडे,गणेश जायभाये,अशोक कांबळे उपशहर प्रमुख राजेश सपाटे कैलास काळुसे सुनील मांटे,निखिल डिगोळे अरविंद खांडेभराड, यांच्या सह अन्य मंडळी उपस्थितीत होते.

दीपक बोरकर यांची भाऊ च्या विजया साठी धडपड

 लोकसभा निवडणुकीसाठी खासदार प्रतापराव जाधव यांच्या उमेदवारी बाबत अनेक चर्चा सांगत असताना दीपक बोरकर हे खासदार प्रतापराव जाधव यांनाच उमेदवारी मिळणार म्हणून निसंकोच होते व मनामध्ये कुठलाही संकोच न ठेवता त्यांनी शिवसैनिकांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या होत्या, लोकसभा निवडणुकीत देखील पायाला भिंगरी लावून संपूर्ण तालुका पिंजून काढला अनेक ठिकाणच्या असलेल्या नाराजा दूर करण्याचा प्रयत्न दीपक बोरकर यांच्या माध्यमातून झाला आणि त्याला यश देखील मिळाल आणी लढाई अंतिम टप्प्यात असताना विजयासाठी श्रींना साकडे घालण्याची संकल्पना दीपक बोरकर यांनी मांडली आणि शिवसैनिक देखील मोठ्या उत्साहात त्यामध्ये सहभागी झाले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये