ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

समाजकार्य विद्यार्थ्यांनी भरोसा सेल, चंद्रपूर येथे दिली भेट

महिलांच्या कौटुंबिक हिंसाचाराच्या पुनर्वसनासाठी जाणून घेतले कार्य

चांदा ब्लास्ट

स्व. सुशिलाबाई रामचंद्रराव मामीडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क, पडोली, चंद्रपूर येथील  एम.एस.डब्ल्यू व्दितीय वर्षाच्या वैद्यकिय व मन: चिकित्सक समाजकार्य विशेषीकरणाच्या विद्यार्थ्यांनी मंगळवार दिनांक ५ डिसेंबर ला भरोसा सेल, चंद्रपूर  येथे भेट दिली.
पोलिस विभागा तर्फे भरोसा सेल च्या माध्यमातून कौटुंबिक हिंसाचाराच्या समस्येने ग्रस्त महिलांना मानसिक आधार देण्यासाठी व त्यांची समस्या सोडवून पुनर्वसनासाठी भरोसा सेल प्रयत्न करते.
भरोसा सेल’ व ‘दामिनी पथक’ यांच्या माध्यमातून पीडित महिला व मुले यांना एकाच ठिकाणी सर्व प्रकारची मदत व सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. या माध्यमातून संकटात सापडलेल्या महिला व मुलांकरिता पोलिस, वैद्यकीय सेवा, मानसोपचार तज्ज्ञ, समुपदेशन, विधी तज्ज्ञ, संरक्षण अधिकारी व पुनर्वसन या सेवा तात्काळ पुरवून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी मदतनीस ठरत आहे. हिंसाचाराचे लक्ष्य ठरलेल्या महिला व मुलांना भरोसा सेलच्या आधारामुळे अत्याचाराविरुध्द लढण्यासाठी मानसिक बळ निर्माण होत आहे, ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे.
पी.एस.आय अश्विनी वाकडे यांनी भरोसा सेल च्या कार्याची माहिती समाजकार्य विद्यार्थ्यांना दिली.
संस्था भेट समन्वयक प्राचार्य डॉ. जयश्री कापसे व प्रा. डॉ. देवेंद्र बोरकुटे यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थी एक्सप्लोझर संस्था भेटी देत आहेत. यावेळी संचालन शिवाणी शेंडे तर आभार प्रीतम दुर्गे याने व्यक्त केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये