ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महागड्या कारसह देशी, विदेशी व बियर दारू वाहतुक करणारे तिघेजन ताब्यात

स्था.गु शाखा, वर्धाची धडक कारवाई ; 6 लाख 62 हजारांवर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

     दिनांक 24/05/2024 रोजी स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा येथील पथकास मिळालेल्या गुप्त माहीती वरून, पो.स्टे. सावंगी हद्दीतील येळाकेळी गावात आर्वी रोडवर नाकेबंदी केली असता खबरे प्रमाणे मारूती सियाज कार क्र. MH 32 Y 3265 येताना दिसली सदर कार ला थांबण्याचा ईशारा केला असता सदर कारचालक याने त्याचे ताब्यातील कार तेथून पाळण्याकरिता रिव्हर्स घेतली असता रोडच्या खाली उतरून अडकली.

       सदर कारची पाहणी केली असता त्यामध्ये तीन ईसम व देशी, विदेशी व बियर असा मुद्देमाल मिळून आला. सदर कार मध्ये आरोपी नामे 1) मुकेश राधेलालजी जयस्वाल, वय 39 वर्ष रा. कळंब, जि. यवतमाळ ह. मु. अयोध्या नगर, नाचणगांव, जि. वर्धा 2) पवन प्रल्हाद धुडे, वय 32 वर्ष, रा. पिपरी मेघे, वर्धा 3) शुभम उर्फ गोलू संजय शिंदे, वय ३७ वर्ष, रा. बोरगाव मेघे वर्धा हे संगणमताने दारूची वाहतूक करताना मिळून आले.

         सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधिक्षक डाॅ. सागर कवडे, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक अमोल लगड, सलाम कुरेशी, शिवकुमार परदेशी, पोलीस अंमलदार हमीद शेख, सचिन इंगोले, श्रीकांत खडसे, राजेश तिवसकर, प्रमोद पिसे, प्रदीप वाघ, रामकिसन ईप्पर, अरविंद इंगोले सर्व नेमणूक स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये