ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

16 नोव्हेंबर ला कोडशी (बू )येथे स्नेह मिलन व गुणवंत सत्कार सोहळा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

स्नेहबंध परिवार, कोडशी बू / गांधीनगर तालुका कोरपना द्वारा स्नेह मिलन तथा गुणवंत सत्कार सोहळा गुरुवार दिनांक १६ नोव्हेंबर ला सकाळी दहा वाजता जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा ,कोडशी बू येथे आयोजित करण्यात आला आहे.

यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवरील पैनगंगा नदीच्या तीरावर, कोरपना तालुक्यात कोडशी बु हे वैभवशाली परंपरा जपणार गाव आहे. या गावाने सामाजिक सांस्कृतिक राजकीय शैक्षणिक कृषी आदी क्षेत्रात नेत्रदीपक यश संपादन केल आहे. इथल्या मातीतल्या भूमिपुत्रांचा स्नेह मिलन व गुणवंत सत्कार सोहळा जळगाव जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सुरेश राजूरकर, नागपूर हायकोर्टाचे सुप्रसिद्ध विधीतज्ञ अड अनिल ढवस यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. पहिल्या सत्रात सकाळी दहा ते दुपारी दोन वाजता पर्यंत उद्घघाटन, स्नेहबंध परिवारातील सदस्यांचे मनोगत, बाहेरगावी स्थायिक शिक्षण नोकरी व्यवसाय उद्योगतील गुणवंताचा परिचय, मुख्य अतिथी मार्गदर्शन, दुसऱ्या सत्रात दुपारी २.१५ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत स्नेहबंध परिवार सदस्य मनोगत, गावातील शिक्षण नोकरी व्यवसाय उद्योगातील गुणवंताचा सत्कार, ज्येष्ठ नागरिकाचा सत्कार, स्नेहभोजन कार्यक्रम अशी कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यात आली आहे.

या कार्यक्रमाला जास्तीत जास्त गावातील स्नेहबंध परिवाराचे सदस्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन स्नेहबंध परिवाराचे इंजी. दिलीप झाडे, श्रीधरराव मालेकर,अड वासुदेव वासेकर, डॉ सुरेश मोहितकर, अरुण मालेकर, दिवाकर मोहितकर, महेश मालेकर, गोपाल मालेकर यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये