ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सुशिलाबाई मामीडवार समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा करिअर गायडन्स मध्ये सहभाग

चांदा ब्लास्ट

 स्व. सुशिलाबाई रामचंद्रराव मामीडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क, पडोली, चंद्रपूर येथील एम. एस. डब्ल्यु द्वितीय वर्ष वैद्यकिय व मन: चिकित्सक समाजकार्य विशेषिकरणाच्या विद्यार्थ्यांची पडोली, चंद्रपूर येथील आय.सी. एम. आर सिकल्सेल संशोधन विभाग येथे दिनांक २ मे ते २ जुन या कालावधीत एक महिन्याचे ब्लॉक प्लेसमेंट सुरु आहे.

आय. सी. एम. आर – सी. आर. एम. सी. एच सेंटर, पडोली येथे समाजकार्य विभागात कार्यरत असलेले रवि गजभिये यांनी दिनांक १७ मे रोजी आय. सि. एम. सेंटर, पडोली येथे विद्यार्थ्यांना ‘भविष्यातील संधी’ या विषयावर मार्गदर्शन केले.

पुढे बोलतांना रवि गजभिये म्हणाले, एम. पि. एस. सी – यू. पी. एस. सी या व्यतिरिक्त समाजकार्य क्षेत्रात अनेक संधी आहेत. परंतु या संधी अनेक विद्यार्थ्यांना माहिती नसतात. अनेक कंपन्यांमध्ये सी. एस. आर. हा प्रोजेक्ट असतो तो समाजकार्याच्या विद्यार्थ्यानी प्राप्त केला पाहिजे. नेट परीक्षा दिली पाहिजे. नेट परीक्षेमुळे अनेक संधी प्राप्त होतात. नेट परिक्षा उत्तीर्ण केली की भारतात कुठेही कार्य करता येते. अनेक संधी उपलबध असूनही त्या आपल्यापर्यंत पोहचत नाही. त्याचे कारण म्हणजे आजच्या विद्यार्थ्यांना याबद्दल जागरुकता नाही. भारतातील शिक्षण प्रणाली ही जास्त प्रॅक्टिकली असली पाहिजे. समाजात काम करण्याचं प्रशिक्षण समाजकार्याचं शिक्षण देतं म्हणून समाजकार्याचं शिक्षण महत्त्वाचं वाटतं. यावेळी विद्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये