Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भेसळयुक्त दुधासंदर्भाने अखिल भारतीय ग्राहक पंचायत चंद्रपूरचे निवेदन

ग्राहक पंचायतची देशव्यापी जनजागृती मोहीम

चांदा ब्लास्ट

भेसळयुक्त दुधासंदर्भाने अखिल भारतीय ग्राहक पंचायत चंद्रपूर जिल्हाध्यक्ष नंदिनी चुनारकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे निवेदन देण्यात आले.

शिष्टमंडळात संगिता लोखंडे, सुषमा साधनकर ,बबीता बोकडे,अंजली धाबेकर,वसंत वरहाटे, पुरूषोत्तम मत्ते,अण्णाजी ढवस, प्रभात कुमार तन्नीरवार, महेश कानपिल्लेवार, हेमराज नंदेश्वर, अशोक मुडेवार,शंभू अडावतकर, शंकर उपरे, जितेंद्र चोरडिया, सुरेश नन्ना वरे,वनकर,चन्ने,पिंपळकर आदी अखिल भारतीय ग्राहक पंचायत पदाधिकारी यांचा समावेश होता.

बाजारातील भेसळयुक्त दुधासंदर्भाने अखिल भारतीय ग्राहक पंचायत ने देशभर हा विषय घेतला असून जिल्हाधिकारी मार्फत शासनाला निवेदन पाठविण्यात आले आहे.

निवेदनाद्वारे अखिल भारतीय ग्राहक पंचायत ने पुढीलप्रमाणे मागण्या केल्या आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यात अन्न तपासणी मोबाईल व्हॅन उपलब्ध करून देण्यात यावी, भरारी पथके तयार करून त्यात अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे प्रतिनिधी घेण्यात यावे, प्रत्येक तहसील स्तरावर दूध नमूने तपासण्यासाठी खुले टेस्टिंग सेंटर उपलब्ध करून देण्यात यावे,अन्न निरिक्षक कार्यालयातील रिक्त पदे भरण्यात यावी आदी मागण्यांचा समावेश होता.

भेसळयुक्त दुधामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे अखिल भारतीय ग्राहक पंचायत ने म्हटले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये