पूर्वाश्रमीचे काहीतरी देणे लागते म्हणूनच नेहमी देऊळगावराजा ला येण्याचे मन करते – आचार्य कुशाग्र नंदिजी गुरुदेव

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
महामना, महातपस्वी, आयुर्वेदाचार्य 108 आचार्य श्री कुशाग्रनंदी जी गुरुदेव ससंघ यांचे दिनांक 22 जानेवारी रोजी देऊळगावराजाच्या पुण्यनगरीमध्ये मंगलमय आगमन झाले 2018 नंतर प्रथमच ते येथील जैन समाजाच्या विनंतीला मान देऊन शहरात आलेले आहेत जैन व अजैन समाजाचे वतीने मुनी संघाचे मंगलमय व भक्ती करीत स्वागत करण्यात आले शहरातील मुख्य मार्गावरून मार्गक्रमित करत गुरुदेव पार्श्वनाथ भवन येथे स्थानापन्न झाले या ठिकाणी त्यांचे पाद प्रक्षालन करण्यात आले.
यावेळी धर्मसभेला आपल्या मधुर वाणीने संबोधित करताना त्यांनी सांगितले की येथील मातीशी माझे यापूर्वीच्या जन्माचे काहीतरी नाते आहे त्यामुळेच येथील जैन समाज फार मोठ्या प्रमाणात मुनिंची सेवा करण्यामध्ये तल्लीन असतात ते करत असलेली मुनी भक्ती पाहून मला राहावेसे वाटत नाही पण नेहमी नेहमी जशी आपल्या घरातील सून माहेरी जाते तसे मला या ठिकाणी तुमच्या मध्ये वास्तव्यास यावे वाटते मी संपूर्ण भारतभर भ्रमण करीत असतो प्रत्येक ठिकाणी भक्त मला विचारतात की देऊळगावराजा शी तुमचं कसं कोणतं नातं आहे की तेथील दिगंबर जैन समाजातील मुनी भक्त तुम्ही ज्या ज्या ठिकाणी वास्तव्य असतात त्या त्या ठिकाणी तुमच्या चरणी नतमस्तक होण्यास येतात त्यावेळी मी त्यांना सांगतो की देऊळगाव राजा हे माझे माहेर घर आहे येथील जैन समाजातील मुनी भक्तामध्ये प्रचंड शक्ती आहे ती शक्ती सुद्धा मला या ठिकाणी खेचून आणण्यामध्ये बाद्य करते “जिसका दाना पाणी जहा लिखा है वो वही जाता हैं” आहे यावेळी या धर्मसभेच्या व्यासपीठावर मुनीश्री अजय ऋषिजी महाराज, राजगुरू स्वस्तीश्री डॉक्टर देवेंद्र कीर्ती स्वामीजी, उपस्थित होते.
या धर्मसभेला शहरातील दिगंबर जैन समाजातील महिला पुरुष युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते संचलन एडवोकेट किशोर खवडे यांनी केले.108 आचार्य कुशाग्र नंदिजी महाराज यांचे स्वागतासाठी येथिल युवतींनी ढोल पथक तयार केले होते ते ढोल पथक या मिरवणुकीचे आकर्षण ठरले