Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

बचत गटाच्या माध्यमातुन महिलांनाची उंच भरारी : शितल भोयर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे क्रांती ज्योती साविञीआई फुले यांच्या जयंत्ती दिनाचा कार्यक्रम व डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचा वर्धापन दिनाचा साविञीबाई फुले महिला बचत गटा तर्फ ३जानेवारीला घेण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सी एम आर सी च्या सचिव भानुमती पाटील,उदघाटक वंदना ताई भुते माजी महिला बालकल्यान सभापती प्रमुख, पाहुणे शितल ताई पंकजभाऊ भोयर,माजी जिल्हा परिषद सदस्या,तथा नियोजन समिती सदस्या नुतनताई राउत,सामाजीक कार्यकर्ता मा,प्रिती जोशी,सत्कार मुर्ती चित्रा चाफले मँडम,लिखीत ठाकरे मँडम,इत्यादी उपस्थित होत्या,सुरवातीला पाहुण्यांचे हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर,व क्रांती ज्योती साविञीआई फुले यांच्या फोटो ला पुप्प हार अर्पण करुन दिप प्रज्वलित करण्यात आले,उपस्थित पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले, कार्यक्रमा चे प्रास्ताविक शारदा झांबरे यांनी केले,तसेच शितल ताई पंकजभाऊ भोयर,चित्रा चाफले मँडम,लिखीता ठाकरे मँडम यांचा साविञीबाई फुले बचत गटा च्या महिला द्वारे सत्कार करण्यात आला,शितलताई भोयर यांनी महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले,बचत गटाच्या माध्यमातुन आज अनेक महिला पुढे आल्या व प्रत्येक क्षेञात कार्य करित आहे तसेच मोठमोठे व्यवसाय करित आहे अनेक महिला उद्योजिका झाल्या,हि सर्व क्रांती ज्योती साविञीआई फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे महिलांना पुरुषांच्या बरोबरी काम करण्या ची संधी मिळाली व त्यांचे आर्थिक परिस्थीती मजबुत होत आहे,तसेच प्रत्येक क्षेञात महिला उंच भरारी घेत आहेत,वंदना भुते यांनी महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले वेळ वाया न घालविता संधी चे सोन केले पाहिजे.

नुतन राउत यांनी आपल्या शब्दातुन सांगीतले कि हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान वर्धा शहराच्या मध्य भागी आहे याला सुंदर आणि सुसज्या करण्याचे काम साविञीबाई च्या लेकीनी केले आहे हे याही पेक्षा सुंदर झाले पाहिजे त्या करिता आता राज्यमंत्री पंकजभाऊ भोयर हे डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्याना कडे लक्ष देवुन याचे सौंदर्याकरण उत्तम स्वरुपाचे करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे अश्या शब्दातुन सांगीतले,जोशी मँडम यांनी महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले तसेच भानुमती पाटील यांनी अध्यक्षिय मनोगत व्यक्त केले,या कार्यक्रमा चे संचालन जया कांबळे यांनी केले तर आभार सलीमुन्नीसा यांनी मानले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्या करिता बचत गटाच्याअध्यक्षा शारदा झांबरे,रत्नमाला साखरे,मायाताई जिवतोडे,वंदना नाईक, अश्विनी वानखेडे नंदा कुसळे,रोशनी उमरे प्रमिला पाटील,सरिता भगत रत्नकला पाटील, विणा वासनिक सारीका खैरकार,पुजा वाल्दे,प्रिती मुंजेवार,प्रिया गीरी, प्रियंका कुमरे,छबु चहांदे,माला हुमने,वनिता चिचघाटे,शमा शेख,मालती राउत, सुधा आडे,सुनिता सोनवने,रेहाना लाला,रिंकु घोडेस्वार,नलु,अनिता कन्नाके अर्चना कोरडे, प्रिती पाटील,बाली मुंडावने,करुणा मुन सुषमा गेडाम,मनिषा मँडम इत्यादि अनेक महिलांनी सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये