पारधीबेडा जवळील नाल्याजवळ अवैदयरित्या गावठी मोहा दारूवर रेड
संपूर्ण मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील गुन्हे प्रगटीकरन पथकाचे अंमलदार हे दिनांक 13/03/2025 रोजी पोस्टे परिसरात होळी सण संबंधाने पोलीस ठाणे परिसरात वॉश आऊट जीना भोसले राहणार खैराटी पारधी बेडा ही बेड्या जवळील नाल्या जवळ अवैदयरित्या गावठी मोहा दारू काढण्याकरता कच्चा मोहा रसायन सडवा गाळीत आहे.
अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर माहीती ठाणेदार देवेंद्र ठाकूर सा. यांना देवून त्यांचे आदेशाने मौजा खैराटी पारधीबेडा येथे पोस्टाँप सह रवाना होवून मिळालेल्या माहीती प्रमाणे पारधीबेडा येथे रेड केला जिना भोसले ही पोलीस आल्याची माहिती मिळतात पळून गेली. तिच्या घराच्या नाल्यालगत पाहणी केली असता पाच लोखंडी ड्रम मध्ये 150 लिटर, सात मोठ्या प्लॅस्टिक ड्रम मध्ये 1050 लिटर, आठ प्लास्टिक लहान ड्रम मध्ये 800 लिटर, तसेच जमिनीत गाळून असलेल्या 18 प्लास्टिक ड्रम मध्ये11800 लिटर कच्चा मोहा रसायन सढवा व दारूभाट्टीचे साहित्य असा एकूण जु. कीं. 2,35,000 रू चा मुद्देमाल मिळुन आला. सदर मुद्देमाल पंचासमक्ष मौक्का जप्ती पंचनामा कार्यवाही करून जप्त करून सदर कच्चा मोहन रसायन सडवा, व लोखंडी व प्लास्टिक ड्रम असे संपूर्ण साहित्य नाश करून करून आरोपी जीना भोसले, राहणार खैराटी पारधीबेडा हीचे विरूध्द पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला.
ही संपूर्ण कार्यवाही मा.पोलीस अधीक्षक अनुराग जैन साहेब, मा.अप्पर पोलीस अधीक्षक डाँ. सागर कुमार कवडे साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडीत सा. यांचे निर्देशानुसार मा. देवेंद्र ठाकूर सा .पोलीस निरीक्षक सा. हिंगणघाट यांचे आदेशाने पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील डि.बी. पथकाचे पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे, पो.ना. राहुल साठे,,पो.शी मंगेश वाघमारे पोशी आशिष नेवारे,यांनी केली. सदर गुन्हयांचा पुढील तपास हिंगणघाट पोलीस करीत आहे