ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
श्री हजरत भोले शाह बाबा दर्गा येथे सभा मंडप तयार करण्याची नगर परिषदेकडे मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा येथील मुस्लीम समाजातील जागृत देवस्थान म्हणून श्री हजरत भोलेशाह बाबा दर्गा ओळखले जाते,300 वर्षांपूर्वीचे हे जागृत देवस्थान असून या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक दर्शनासाठी येतात, उन वारा पाऊस पासून संरक्षण होण्यासाठी या ठिकाणी सभा मंडप नगर परिषदेमार्फत तयार करून द्यावा अशी मागणी येथील नागरिकांनी मुख्याधिकारी अरुण मोकळं यांच्याकडे निवेदनद्वारे केली आहे.
निवेदनावर मंगेश तिडके, विकास भाग्यवंत, अफरोज खान नजीर खान, शेख झाकीर अब्दुल हमीद, गोविंद कासारे, मो सहिम मो सलीम, शेख अकिब शेख पाशू, शौकत खान कोटकर, गणेश खांडेभराड, बाळू खांडेभराड, जालिंदर मेहेत्रे,शेख शाकेर अब्दुल हमीद व इतर नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.