शासकीय मदतीला होल्ड लावू नका _ जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
काही बँका शेतकऱ्यांना मिळणाऱ्या शासकीय मदतीला व पीक विमाच्या रकमेला होल्ड लावत असल्यामुळे शेतकऱ्यांना शासकिय मदत व पीक विम्याची रक्कम वेळेवर मिळण्यास विलंब होत असल्याबाबतच्या तसेच कर्ज देतेवेळी सिबिल स्कोरची अट लावण्यात येत असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्राप्त झाल्यानंतर सर्व बँकांनी कुठल्याही शासकिय मदतीला व पीक विम्याच्या रकमेला होल्ड लावू नये, त्यातून कुठल्याही प्रकारची कर्ज वसुली करु नये, या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधीत बँकेच्या शाखा व्यवस्थापका विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, तसेच बँकेत येणाऱ्या प्रत्येक ग्राहकास सन्मानाची वागणूक देण्यात यावी असे जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी सर्व बँक व्यवस्थापकाना 27 मे रोजी कळविण्यात आले आहे.