ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या वाढदिवसानिमित्ताने मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न

325 गरजू रुग्णांनी घेतला शिबिराचा लाभ 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

         महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या वाढदिवसानिमित्ताने श्री गणपती नेत्रालय जालना यांचे मोफत नेत्र तपासणी शिबीर व मोतीबिंदू निदान शिबिराचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे वतीने करण्यात आले होते. सदर शिबिरामध्ये 325 गरजू रुग्णांनी तपासणीचा लाभ घेतला.

        देऊळगाव राजा तालुक्यातील जवळखेड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच श्री गणपती नेत्रालय जालना यांच्या संयुक्त विद्यमाने राज्याचे माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मोफत नेत्र तपासणी शिबिरघेण्यात आले. सदर शिबिराचे उद्घाटन माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जवळखेड येथील सरपंच शशिकलाबाई गाठोळे ह्या होत्या.

प्रमुख उपस्थितीमध्ये बाजार समितीचे सभापती समाधान शिंगणे, माजी जि.प. उपाध्यक्ष गंगाधर जाधव, माजी प. स. सभापती सौ.रेणुकाताई बुरकूल,सौ. कल्याणीताई शिंगणे, खरेदी विक्री संस्थेचे अध्यक्ष परमेश्वर शिंदे, बाजार समितीचे माजी सभापती महेश देशमुख, रंगनाथ कोल्हे,माजी नगराध्यक्ष कवीश जिंतूरकर, राष्ट्रवादीचे नेते राजीव शिरसाठ, एल. एम. शिंगणे, तोतारामजी नागरे, अशोक शेळके, सि. राजा तालुकाध्यक्ष राजेंद्र अंभोरे, युवक तालुका अध्यक्ष गजानन चित्ते, माजी तालुका अध्यक्ष युवक गजानन चेके, शिवहारी बुरकुल, गणेश बुरकुल, जनार्धन मगर,जिल्हाध्यक्ष सोशल मीडिया अमोल भट, भिकाजी निलक, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष विजय खांडेभराड, नवनाथ गोंधरे यांची प्रमुख उपस्थिती होती.या शिबिरामध्ये 325 गरजू रुग्णांनी नेत्र तपासणीचा लाभ घेतला. त्यापैकी 67 रुग्णांचे मोतीबिंदू निदान झाल्याने त्यांना श्री गणपती नेत्रालय जालना येथे मोफत शस्त्रक्रिया चा लाभ देण्यात येणार आहे.

शिबिर यशस्वीतेसाठी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे, बाजार समितीचे माजी सभापती गजानन पवार, गणेश सवडे, युवक शहराध्यक्ष अभिनव खांडेभराड, मनोज राजे जाधव, दिनकर गाठोळे आदींनी परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये