ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

परप्रांतीय फेरीवाल्या कडुन वाघाची शिकार

"हरियाणातील बावरीया लोकांचा प्रताप" 'उपक्षेत्र व्याहाड अंतर्गत राजोलीफालयेथील घटना'

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा.शेखर प्यारमवार

चटया, बाँग,कपड़े विकन्याच्या बहान्याने जंगलव्याप्त भागालगत डेरा ठोकुन वाघाची शिकार केल्या प्रकरणी तीन आरोपिना पुढील तपासासाठी तीन दिवस वनकष्टडी सुनावन्यात आली रुमाली बावरी ३८ वर्ष, राजू सिंग २४, सोनू सिंग २८ असे आरोपिचे नाव असून ते मध्यप्रदेश राज्यातील रहिवाशी होते.

वनजिव गुन्हे नियंत्रण ब्युरो ने देशातील व्याघ्र प्रकल्पात वाघाच्या शिकाराची शक्यता वर्तविली होती,या आधारावर गडचिरोली जिल्ह्यातील आंबेशिवणी येथे पर्स,बॉग,भांडी विकण्याचे सोंग घेऊन आलेल्या.फेरीवाल्यांच्या तपासाअंती गडचिरोली जिल्हा सह चंद्रपुर जिल्हातील.काही भागात वाघाची शिकार झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती,त्या आधारावर वाघाची शिकार प्रकरणी कसुन तपासणी केली असता,जिल्हातील सावली वनपरिक्षेञ अंतर्गत उपवन व्याहाड खुर्द,नवेगांव बिटातील क्रक्ष क्र.१५६५ राजोली फाल.या भागात दिड ते दोन वर्षाच्या पट्टेदार वाघाची शिकार करुन मिशा,चमडी, दात,नखे लंपास करुन उर्वरीत मास नाल्यात पुरल्या गेल्याची माहीती वनविभागाकडुन सांगितल्या गेली आहे, सदर घटना शेतीचा खरीप हंगामा संपल्यानंतर रिकाम्या शेती मध्ये परप्रांतीय लोक आपल्या रोजगाराच्या निमित्ताने बि-हाड थाटून वास्तव्य करीत असतात याच निमित्ताने परप्रांतीय मध्य प्रदेशातील आलेल्या बावरीया जमातीतील लोकांनी सावली वनपरिक्षेत्रातील उपवन व्याहाड खुर्द,कक्ष क्र.१५६५ मध्ये २ पट्टेदार वाघाची शिकार झाल्याचे.वनविभागाकडुन सांगितल्या जात असुन त्यां आरोपिंना ३ दिवसाची वनकोठडी सुनावण्यात आली आहे.

जिल्हातील ब्रम्हपुरी वन वृत्ता अंतर्गत येणाऱ्या सर्वात मोठ्या येणाऱ्या सावली वनपरिक्षेञ अंतर्गत मोठ्या वनजिवाचे.वावर.असून.या वनात असणाऱ्या वन्यजीवांची तस्करी परप्रांतीया कडुन होत असल्याचे.सदर.घटनेतुन दिसुन येत आहे. वाघाची शिकार प्रकरणी पुढील तपास सहाय्यक वनसंरक्षक शेडगे यांच्या मार्गदर्शनात सावली वनपरिक्षेञ अधिकारी पि.जी.विरुटकर, वनपरिक्षेञ अधिकारी नायगमकर,सावली क्षेत्र सहायक राजु कोडापे सह वनकर्मचारी करीत आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये