आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयची माजी विद्यार्थीनी कु. पूर्वीता एम.पी.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर ता.कोरपना जि. चंद्रपूर येथील माजी विद्यार्थिनी कु. पूर्वीता वासुदेव मून रा.गडचांदूर हि एम पी एस सी ने घोषित केलेल्या टॅक्स असिस्टंट 2021 या परीक्षेच्या निकालात एससी प्रवर्गात महिलांमधून राज्यात सातवी रँक घेऊन उत्तीर्ण झाली आहेत. तिने मिळविलेल्या यशाबद्दल गडचांदुर शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदुरचे सचिव श्री. धनंजय गोरे,उपप्राचार्य महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय प्रफुल्ल माहुरे, प्रा प्रदीप परसुटकर, प्रा. सचिन भैसारे यांनी तिच्या घरी जाऊन पुष्पगुच्छ देऊन व पेढे देऊन हार्दिक अभिनंदन केले,व पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये