ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावती शहर तथा तालुक्यात शांततेत पार पडले मतदान

सरासरी 58 टक्के झाले मतदान ; अनेक मतदारांची नावे यादीतून गहाळ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

 प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर मतदारांनी व्यक्त केला रोष

घोडपेठ येथील ग्रामपंचायत सदस्या कविता शेळके यांचे सुद्धा नाव यादीतुन गहाळ

             लोकसभा निवडणुकीच्या चंद्रपूर – वणी – आर्णी लोकसभा क्षेत्रात प्रथम चरणात दिनांक 19 रोज शुक्रवारला घेण्यात आलेल्या मतदानाची प्रक्रिया कुठेही गालबोट न लागता भद्रावती शहर तथा तालुक्यात शांततेत पार पडली. भद्रावती शहरात 60 मतदान केंद्रांवर व तालुक्यातील ग्रामीण भागातील मतदान केंद्रांवर सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली असली तरी मतदार यादीत अनेक मतदारांची नावे नसल्यामुळे अनेकांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागले. घोडपेठ येथील ग्रामपंचायत सदस्या कविता भास्कर शेळके यांचे नाव यादीत नसल्यामुळे त्यांना सुद्धा मतदानापासून वंचित रहावे लागले. तर मतदार यादीत चार-पाच वर्षांपूर्वी मयत झालेल्या मतदारांची नावे दाखविण्यात आल्याने प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर मतदारांनी रोष व्यक्त केला.

मतदान प्रक्रियेच्या दरम्यान शहर तथा तालुक्यात कोणतीही अनुचित घटना आढळून आलेली नाही. या मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर व भाजपा महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार या प्रमुख उमेदवारांसह इतर उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये