अखिल – युवाशक्ती सोशल वेल्फेअर फाउंडेशनच्या प्रयत्नाला मिळाले यश
पहिल्यांदा सुरु झाली चंद्रपूर ते पिपरी (देशमूख) या मार्गावर एस.टी. बस
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
कोरोना काळापासून या पिपरी ( देश ) कोच्ची ‘घोनाड . मूरसा’ या गावामध्ये बस फेरी बंद झाली. तेव्हा पासून कुठूनच बस येत नव्हती. या भागातील शाळा ‘कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑटोने टूव्हीलर ने भद्रावती’ चंद्रपूर या ठीकाणी शिक्षणा साठी जाण्याच्या फार मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता. वयोवृद्धांना ‘तालुक्याच्या ठीकाणी . दवाखाना’ बँकेचे कामा करीता जाणे येणे फार कठीन काम झाले आहे. त्या करीता अखिल युवाशक्ति सोशल वेल्फेअर फाउंडेशन चे जिल्हा अध्यक्ष शुभम दिलीप मते रा. घोनाड व सर्व सदस्य हे मा. हंसराज अहिर अध्यक्ष राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग तथा पूर्व केंद्रिय गृह राज्यमंत्री भारत सरकार तसेच मा. करण देवतळे आमदार वरोरा भद्रावती निर्वाचन क्षेत्र याना भेटून चंद्रपूर ते पिपरी बस सेवा सुरु करण्याकरीता निवेदन देऊन सतत पाठपुरावा केला व युवा शक्ति सोशल वेल्फेअर फाऊडेशन ला यश आले.
आज दि. 3/3/२०२५ला पिपरी देशमुख) येथे बस आली. सदर बस ही चंद्रपूर आगारातून सकाळी ९.३० ला सूटत असून पिपरी येथे १०-30 वा पोहचत असते तर सा. 5.30 ला सूटत असून 6.30 लां पिपरीला पोहचत असते. सदर बस चे गावकर्या मार्फत तसेच युवाशक्ती चे सर्व कार्यकर्ते मूरसा ‘घोनाड’ कोच्ची येथील प्रतिष्ठित नागरीक मोठ्या संख्येन पिपरी (देश) येथे उपस्थित झाले होते. गावात बस आल्यानंतर बस चालक, वाहक यांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा. अमित गुंडावार (भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारणी सदस्य) उपस्थित होते. अर्चना नांदे सरपंच पिपरी’ सुनिता रत्नाकर ठोंबरे पोलीस पाटील पिपरी’ रुखमाताई मते माजी सरपंच घोनाड ‘संदिप खुटेमाटे ग्रा.प. सदस्य पिपरी’ प्रशात बोन्डे उपसरपंच घोनाड. पंकज खटाळे उपसरपंच पिपरी ‘विजय मडावी ग्रा : प. सदय पिपरी’ दिलीप मते शक्ती प्रमूख घोनाड ‘बळीराम जी रोडे मूरसा’ पढरी नांदे मूरसा ‘नितेश नांदे मूरसा’ निखील देवीदास खुटेमाटे ‘युवाशक्ती अध्यक्ष पिपरी’ संकेत नारायण काकडे युवा शक्ती सदस्य पिपरी ‘रत्नाकर ठोंबरे, विपूल ढपकस ‘युवाशक्ती सदस्य पिपरी’ श्रींकात डोंगे माजी जिल्हा परिषद सदस्य पिपरी सतिष झाडे मूरसा व युवा शक्तीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .