ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथे दि. १४ एप्रिल रोजी त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला.सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक धर्मराज काळे होते. प्रमुख मार्गदर्शक शाळेचे पर्यवेक्षक महेंद्र कुमार ताकसांडे,प्रमुख अतिथी म्हणून प्रा.विजय मुप्पिडवार, ज्येष्ठ शिक्षिका ज्योती चटप उपस्थित होते.याप्रसंगी सर्वप्रथम बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा प्रमुख मार्गदर्शक शिक्षकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर मार्गदर्शन केले. तसेच त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचे उपस्थितांना आव्हान केले. या कार्यक्रमाचे संचालन प्रा.अनिल मेहरकुरे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.नितीन सुरपाम यांनी केले. कार्यक्रमाला शाळा/कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये