ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ज्ञानार्चनाने पार पाडला अभिनव विवाह सोहळा

चांदा ब्लास्ट

१०० टक्के अंधत्व असलेल्या पुष्पा वामनराव मुरुकुलवार हिच्या सख्या बहिणीचे, हेमलता वामनराव मुलकुलवार हिचे वास्तव्य गत २ वर्षांपासून अर्चना मानलवार भोयर यांच्या ज्ञानार्चना या संस्थेत होते. या बंहिनाना आईवडिलांचे छत्र नाही. ही गोष्ट हेरुन अर्चना व तिचे पती प्रफुल भोयर यांनी पुढाकार घेत स्वखर्चाने हेमलताचे लग्न रितीरिवाजानुसार येथील जगन्नाथबाबा नगर स्थित मातोश्री गार्डनमध्ये उत्साहाच्या वातावरणात नुकतेच आप्तेष्टांच्या उपस्थितीत लावून दिले.

श्री बाबा चाफले यांनी या सामाजिक हळव्या क्षणासाठी त्यांचा मातोश्री गार्डनचा हॉल निःशुल्क दिला होता हे इथे उल्लेखनिय. त्याचप्रमाणे हेमलताला वधू म्हणून सजवण्याची जबाबदारी सौ स्नेहलता काळे यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून पार पाडली. तसेच सुशिलाबाई रामचंद्राराव मामिडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क पडोली चंद्रपूरच्या वैद्यकिय व मन : चिकित्सक समाजकार्य विषेशिकरनाचे विद्यार्थ्यांनी मंगल सोहळ्यात स्वंयसेवक म्हणून आपला खारीचा वाटा उचलला.

ह्या आगळ्यावेगळ्या सोहळ्याची सर्वत्र चर्चा होती. उपस्थितांनी वरवधुला भरभरून आशीर्वाद दिले. आपले सामाजिक ऋण फेडण्याऱ्या ज्ञानार्चनाच्या अर्चानाचे पती प्रफुल भोयरचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये