ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खडकी शाळेत साजरा झाला निरोप समारंभ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

10 एप्रिल रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडकी पं. स. कोरपना जि. चंद्रपूर येथे वर्ग चौथी च्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. चार वर्ष जे विद्यार्थी या शाळेत शिकून अध्ययना सोबत विविध सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ व क्रीडा यात ज्यांनी हिरीहीरीने भाग घेऊन शाळेचं तसेच गावाचा नाव उज्ज्वल केल.

अशा विद्यार्थ्यांना निरोप देताना शिक्षक गहिवरून गेले होते. एक आत्मिक समंध अतूट असं नातं विध्यार्थी आणि शिक्षकांचे इथे बघायला मिळाले. विद्यार्थ्यांचे पण डोळे या क्षणी पानावले होते. विद्यार्थ्यांना भेट स्वरूपात भेटवस्तू देण्यात आल्या. गोड पदार्थाचे जेवण देण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सौ अवंतिका ताई आत्राम सरपंच ग्रामपंचायत रुपपेठ, हरिरामजी किन्नाके अध्यक्ष शा. व्य. समिती, सुनंदा मेश्राम उपाध्यक्ष शा. व्य. स., तसेच सर्व सदस्य ग्रामपंचायत व शाळा व्य. समिती होते तसेच कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित नागरिक, गावातील नवयुवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक तुमराम सर आणि समरीतकर स. शि. यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये