ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सिंदखेड राजा : येथे मतदान जनजागृती कार्यक्रम संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील सिंदखेडराजा विधानसभा क्षेत्रामध्ये निवडणुकीसाठी नियोजनबद्ध तयारी चालू आहे, लोकशाहीचा हा उत्सव साजरा करण्यासाठी सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघातील सिंदखेड राजा येथे मा. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रा. श्री. संजय खडसे,मा.तहसीलदार सिंदखेड राजा श्री. सचिन जयस्वाल, मा. तहसीलदार देऊळगावराजा वैशाली डोंगरजाळ, मा. नायब तहसीलदार निवडणूक श्री. मनोज सातव, अस्मा मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली आज मा. मुख्याधिकारी सिंदखेड राजा श्री. प्रशांत व्हटकर यांच्या माध्यमातून विविध उपक्रमातुन मतदानासाठी जनजागृती करण्यात आली.

SWEEP उपक्रमांतर्गत नगरपरिषद सिंदखेडराजा राजा, महसूल विभाग देऊळगाव राजा, शिक्षण विभाग, सर्व शाळा महाविद्यालय यांच्या सहभागामधून आज दिनांक 10 एप्रिल २०२४ रोजी सकाळी शहरातून दिव्यांग रॅलीचे, शाळेतील विध्यार्थ्यांच्या रॅलीचे भव्य आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद गावातील नागरिकांकडून मिळाला आहे, या सर्व उपक्रमाचे व्यवस्थापन नगरपरिषद सिंदखेडराजा यांच्यावतीने करण्यात आले होते.

 आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी विविध प्रकारे संदेश काही स्लोगन च्या माध्यमातून देण्यात आले.

“गरीब-श्रीमंत, जात-धर्म-लिंग या भेदापासून दूर म्हणजे आपले मत, सर्वांना समान अधिकाराच्या तत्त्वाची प्रतिबिंब म्हणजे आपले मत”लोकशाहीतील समानतेचे ही मूल्य अधिक बळकट करूया, चला आत्मविश्वासाने मत देण्याचा निर्धार करूया.

“जागरूक आणि जाणकार मतदार होऊ या, माहितीच्या आधारे योग्य उमेदवार निवडून या”

“प्रलोभन मुक्त निवडणुकीचा निर्धार करू, उत्सव लोकशाहीचा साजरा करू”

आजच्या या कार्यक्रमाला मा. मुख्याधिकारी सिंदखेड राजा राजा नगरपरिषद श्री. प्रशांत व्हटकर तसेच सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होता.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये