ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चांदा पब्लिक स्कूलची किंजल प्रेमकुमार भगत राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत (लांब उडी) स्पर्धेसाठी पात्र

चांदा ब्लास्ट

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नागपूर, जिल्हा क्रीडा परिषद,नागपूर व नागपूर शहर महानगर पालिका नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत  विभागीय स्तरीय मैदानी स्पर्धेचे आयोजन दिनांक 13, 14 व 15 ऑक्टोंबर 2023 रोजी विभागीय क्रीडा संकूल नागपूर येथे घेण्यात आले होते. या स्पर्धेत विविध जिल्हयातील 250 ते 300 विद्यार्थ्यांचा समावेश होता. यात चंद्रपूर जिल्हयातील किंजल प्रेमकुमार भगत या विद्यार्थीनीने लांब उडी या प्रकारात यश प्राप्त केले. क्रीडा क्षेत्रात मिळविलेल्या यशाने शाळेचे नाव उंचावले आहे.

तसेच राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेचे आयोजन चंद्रपूर जिल्हयातील तालुका क्रीडा संकुल विसापूर येथे दि. 29 ऑक्टोंबर 2023 ते 02 नोव्हेंबर 2023 पर्यंत करण्यात येणार आहे.

या यशाबद्दल शाळेच्या संचालिका श्रीमती स्मिता संजय जीवतोडे, प्राचार्या आम्रपाली पडोळे यांनी किंजलचे कौतुक करत पुढील होणा-या राज्यस्तरीय स्पर्धेकरीता शुभेच्छा दिल्या. तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शारीरीक  शिक्षकांनी  अभिनंदन केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये