ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंदन सिंह चंदेल यांच्या वाढदिवस निमित्त रक्तदान शिबिर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत रणदिवे

बल्लारपूर :- शहरातील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदन सिंह चंदेल यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन एकदंत लॉन मध्ये करण्यात आले होते.

     या शिबिरात २० महिला सह १७५ पुरुषांनी रक्तदान केले. सर्व रक्तदान करणाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आले. हे सर्व रक्त चंद्रपूर वैद्यकिय महाविद्यालय येथील कर्मचाऱ्यांनी संकलन केले.

     या शिबिरात विश्वजित चंदेल, भाजपा शहर महासचिव मनिष पांडे, भाजयुमो अध्यक्ष ऍड रणविजय, शिवचंद त्रिवेदी, देवेंद्र वाटकर, घनश्याम बुरडकर, सतीश कनकम, किशोर मोहुर्ले सह आदी भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये