ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नो – पार्किंग व नो हॉकर्स झोन घोषित

नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन

चांदा ब्लास्ट

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ८ एप्रिल २०२४ रोजी मोरवा येथे प्रचार दौरा आयोजित करण्यात आला आहे. सदर सभेकरीता नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्याकरिता दि. ७ एप्रिलच्या दुपारी २ वाजता पासून ते ८ एप्रिल २०२४ च्या रात्री ८ वाजेपर्यंत मोरवा विमानतळ पासून ते मोरवा टी- पॉईंट-पडोली चौक-वरोरा नाकापर्यंत तसेच मोरवा टी पॉईंट ते साखरवाही फाटा हे दोन्ही मार्ग नो पार्किंग व नो हॉकर्स झोन म्हणून घोषित करण्यात येत आहे.

 पंतप्रधानांच्या दौ-याकरीता नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असल्यामुळे सदर मार्गावर वाहतूक सुरळीत चालावी, वाहतुकीस कुठल्याही प्रकारचा अरथळा निर्माण होऊ नये व जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून महाराष्ट्र पोलिस अधिनियम – १९५१ च्या कलम ३३ (१)(ब) नुसार सार्वजनिक ठिकाणी सुरळीत रहदारी व सुव्यवस्था राखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना व नियमनासाठी प्राप्त असलेल्या कायदेशीर अधिकारान्वये जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांनी सदर आदेश निर्गमीत केले आहे.

तरी सदर मार्गावर कोणत्याही नागरिकांनी वाहने पार्किंग करू नये तसेच या मार्गावर कोणीही दुकाने / हातठेले लावू नये. नागरिकांनी सदर आदेशाचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करावे, असे अवाहन असे पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये