ताज्या घडामोडी

ऐतिहासिक भद्रावती नगरीतील श्री भद्रनाग स्वामी मंदिरात उसळला जनसागर !

हर हर महादेवाच्या गजराने दुमदुमली भद्रावती नगरी

चांदा ब्लास्ट :अतुल कोल्हे भद्रावती:-

शहरातील सुप्रसिद्ध तथा ऐतिहासीक श्री भद्रनाग स्वामी मंदिरात नागपंचमीच्या यात्रेला मोठ्या उत्साहात सुरवात झाली. नागपंचमीच्या दिवशी लाखो भाविकांनी श्री. भद्रनाग स्वामींचे दर्शन घेतले.
श्री भद्रानाग स्वामींच्या अभिषेक पूजेनंतर मंदिर दर्शनासाठी भविकांकरिता खुले करण्यात आले. अगदी पहाटे पासुन मंदिरात भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.
सदर या यात्रेत येणाऱ्या भाविकांना असुविधा होऊ नये यासाठी गांधी चौक ते भद्रनाग मंदिरापर्यंत मुख्य रस्ता आम वाहूतुकीसाठी बंद करून या रस्त्यावरील वाहतूक अन्य रस्त्याने वळविण्यात आली होती. शहरात भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती.


मंदिर प्रशासनातर्फे या नागपंचगमी यात्रे निमित्य मंदिराला आकर्षकरीत्या सजविण्यात आले. त्याच प्रमाणे मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच मंदिरात परिसरात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी ठाणेदार गोपाल भारती यांच्या मार्गदर्शनात चोख पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला. अग्निशमन दलाचे गाडीही परिसरात तैनात करण्यात आली. ही नागपंचगमी यात्रा यशस्वी करण्यासाठी भद्रनाग स्वामी देवस्थान अध्यक्ष डॉ. रमेश मिलमिले, उपाध्यक्ष योगेश पांडे व पदाधिकारी,पोलीस प्रशासन, नगर पालिका प्रशासन तथा मंदिर प्रशासना तर्फे योग्य ती व्यवस्था व भाविकांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये