ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कळमना येथिल हर्षल मोरेची नवोदयसाठी निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत रणदिवे

बल्लारपूर :- तालुक्यातील जि.प.प्राथ.शाळा कळमना येथील विद्यार्थी हर्षल गुरूदास मोरे याची जवाहर नवोदय विद्यालय बाळापूर तळोधी साठी निवड झालेली आहे.

       वडील गुरुदास मोरे हे गावात किराणा दुकान चालवतात तर आई कविता ह्या घर आणि शेती सांभाळतात. उपक्रमशिल भान हरपून काम करणारे शिक्षक अमित साखरकर यांचे हर्षलला मार्गदर्शन लाभले. वर्ग पहिलीपासूनच हर्षल यांनी त्या दृष्टीने तयारी त्यांनी करुन घेतली. हर्षल हा अतिशय शांत आणि शिस्तप्रिय विद्यार्थी आहे.

सोडवता न येणाऱ्या गोष्टी तो वारंवार साखरकर शिक्षकांना विचारत असायचा. कधी रात्रीही मोबाईलवर चर्चा करुन समाधान करुन घ्यायचा. तसेच हर्षल शाळेतील प्रत्येक स्पर्धेत सहभागी व्हायचा. नवरत्न स्पर्धेत त्याने जिल्हास्तरापर्यंत मजल मारली होती.

अशा गुणी विद्यार्थ्यांची निवड झाल्याबद्दल मुख्याध्यापक सुनील पोटे, शिक्षक कहुरके, शिक्षिका शेख, शिक्षिका कोवे, शा.व्य.समिती अध्यक्ष विलास बावणे तथा सर्व सदस्य यांनी हर्षलचे अभिनंदन केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये