ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वर बैलाच्या चारा, खाली रेती ; अवैध रेती वाहतुकीचा नवा फंडा

सिंदेवाही तहसीलदारांनी रेती तस्करांच्या आवळल्या मुसक्या ; महसूल विभाग ॲक्शन मोडवर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत गेडाम

सिंदेवाही – रेती तस्करांनी रेतीच्या अवैध वाहतुकीसाठी नवीन फंडा अमलात आणले आहे.गोपनीय माहिती आधारे सिंदेवाही तहसीलदार यांनी आज सोमवार (दि. १ एप्रिल ला) दुपारच्या सुमारास मुरमाडी रेती घाट मार्गावर (ता. सिंदेवाही) शिवारात केलेल्या कारवाईत स्पष्ट झाले.विना क्रमांकाच्या ट्रॅक्टर मध्ये खाली रेती आणि वर बैलाचा चारा भरून नेत असल्याचे आढळून आले असता.,

तहसीलदार संदीप पानमंद यांना ट्रॅक्टर मुरमाडी रेती घाट मार्गावरून निघाल्याने संशयस्पद वाटल्यामुळे सदर रेतीच्या ट्रॅक्टर ,अडवून पहाणी केली असता ट्रॉलीमध्ये वर बैलाच्या चारा (तनीस), खाली रेती आढळून आली ट्रॅक्टर ट्रॉली पुढील कारवाईसाठी तहसील कार्यालयात 1ब्रास रेतीसह जप्त करण्यात आली आहे. विना क्रमांक असलेल्या या सदर ट्रॅक्टर ट्रॉलीवर दंडात्मक कारवाई साठी चिमूर उपविभागीय अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठविला आहे.

असे सिंदेवाही तहसीलदार संदीप पानंमद यांनी सांगितले आहे. सदर ट्रॅक्टर हा मुरमाडी येथील एका लोकप्रतिनिधीच्या नातेवाईकाचा आहे अशी सिंदेवाही तालुक्यातील नागरिकांमध्ये चर्चा केल्या जात आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये