ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भाजपा निवडणूक प्रचार कार्यालयचे उद्घाटन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत रणदिवे

बल्लारपूर :- चंद्रपूर – वणी – आर्णी लोकसभाक्षेत्रातून भाजपाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचार कार्यालय चे उद्घाटन येथील बस स्टँड जवळील वेंकटेश एम्पोरियम कॉम्प्लेक्स येथे काल ३१ मार्च रोजी झाला.

      या वेळी भाजपा चे वरिष्ठ नेते चंदन सिंह चंदेल, भाजपा शहर अध्यक्ष काशीनाथ सिंह, आर पी आय (कवाडे) चे जिल्हा अध्यक्ष हरिशभाई दुर्योधन, शिव सेना (शिंदे गट) चे कमलेश शुक्ला, भाजयुमो चे आशिष देवतळे, भाजपा महिला मोर्चा चे रेणुका दुधे यांनी मार्गदर्शन केले.

       मंचावर भाजपा ज्येष्ठ नेते चंदन सिंह चंदेल, भाजपा जिल्हा अध्यक्ष (ग्रामीण) हरीश शर्मा, भाजपा शहर अध्यक्ष काशीनाथ सिंह, वरिष्ठ नेते निलेश खरबडे, समीर केणे, सतविंदर सिंह दारी, भाजपा शहर महासचिव मनिष पांडे, शिवचंद त्रिवेदी सह अन्य मान्यवर उपस्थित होते.

    कार्यालयाचे उद्घाटन भाजपा चे उपस्थित मान्यवर सहित ज्येष्ठ पत्रकार वसंत काका खेडेकर यांचे हस्ते झाले. या वेळी भाजपा शहर सचिव सतीश कनकम यांच्या नेतृत्वात चंदन राजपूत सहित ५० लोकांनी भाजपा मध्ये प्रवेश केले. त्यांना चंदन सिंह चंदेल यांचे हस्ते दुपट्टा देऊन त्यांचे स्वागत केले. संचालन भाजपा शहर महासचिव मनिष पांडे यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये