ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पावर फ्रंट कंत्राटी संघटनेचा प्रतिभाताई धानोरकर यांना पाठिंबा जाहीर

चांदा ब्लास्ट

महाविकास आघाडीच्या चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार प्रतिभाताई धानोरकर यांना पावर फ्रंट कंत्राटी संघटनेने पाठिंबा जाहीर केला आहे. हुकूमशाही विरोधातील लढ्यात आम्ही खंबीरपणे आपल्या सोबत असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

चंद्रपूर जिल्हयातील पावर फंट कंत्राटी संघटना ही राष्ट्रवादी कॉग्रेस सोबत निगटीत आहे.या संघटनेचे मार्गदर्शक श्रीमाननीय शरदचंद्रजी पवार साहेब (राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस) असून डॉ. जितेंद्र आव्हाड हे संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. या लोकसभा निवडणुकी मध्ये लोकशाही व संविधान जिवंत ठेवण्यासाठी व कामगारांना न्याय देण्यासाठी चंद्रपूर जिल्हयातील हजारो कंत्राटी कामगार तुमच्या पाठीशी उभे आहेत. त्यामुळे तुमचा विजय निश्चित आहे. तसे आपणास वचन देतो.असे पावर फंटचे चंद्रपूर शाखा अध्यक्ष माननीय युवराज मैंद यांनी प्रतिभाताई धानोरकर यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

चंद्रपूर आर्णी लोकसभा मतदार संघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभाताई धानोरकर यांना मतदार संघातून मोठा पाठिंबा मिळत आहे. चंद्रपूर शहरात निघालेल्या रॅली आणि सभेला अलोट गर्दी उसळली होती. रखरखत्या उन्हाची पर्वा न करता प्रतिभाताई यांना समर्थन देण्यासाठी मतदार संघाच्या कानाकोपऱ्यातून जनता आली होती. हुकूमशाही विरोधातील लोकशाहीच्या या लढ्यात विविध संघटना प्रतिभाताई धानोरकर यांच्या सोबत खंबीरपणे उभ्या झाल्या आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये