ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गडचांदुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण

तीन आमदारांची उपस्थिती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

नगरपरिषद गडचांदूर व आमदार सुभाष धोटे यांच्या पुढाकाराने गडचांदूर येथील मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण शिवजयंतीच्या निमित्ताने पार पडले.

        पुतळा अनावरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राच्या आमदार प्रतिभा धानोरकर उपस्थित होत्या. लोकार्पण आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते करण्यात आले. तर विशेष अतिथी म्हणून शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा प्रमुख अरुण निमजे, नगराध्यक्ष सविता टेकाम, राजुराचे माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यावेळी मंचावर उपस्थित होते.

शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा स्थापन केल्यामुळे शहराच्या सौंदर्यात वाढ झालेली आहे, गडचांदूर शहराच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही याप्रसंगी आमदार सुभाष धोटे यांनी दिली,याप्रसंगी शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये