ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गडचांदुर येथे दुसऱ्या टप्प्यातील तीन दिवसीय शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणाचा समारोप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंतर्गत येत असलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षणाचा अधिकारी समारोप पार पडला.

गडचांदूर येथील होली फॅमिली पब्लिक कॉन्व्हेंटच्या सभागृहात सदर प्रशिक्षण घेण्यात आले असून पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण श्री. शिवाजी इंग्लिश स्कूल नांदाफाटा येथे पार पडले. या प्रशिक्षणात रुपेश विरुटकर, सलमा कुरेशी, एस. के. शुक्ला, प्रदीप परसुटकर, स्वप्निल सातपुते, निकेतन जयपूरकर, साईनाथ मेश्राम व शामराव पवार यांनी तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम पाहिले.

कोरपना गटशिक्षणाधिकारी सचिन मालवी, केंद्रप्रमुख मुसळे, विषय साधन व्यक्ती भीमराव कोरडे यांच्या मार्गदर्शनात सदर प्रशिक्षण सुरळीत पार पडले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये