ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जि. प.उच्च प्राथमिक शाळा दुर्गाडी येथे 77 वा स्वातंत्र्य दिन समारोह उत्साहात पार पडला

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

या प्रसंगी शा.व्य. स चे अध्यक्ष श्री देविदास शिरपुरकर उपाध्यक्ष विकास कडु प्रमुख अतिथी साधना ताई कुमरे सरपंच. अनिल खडसे पो.पा.श्री निखील खडसे उपसरपंच दिनेश खडसे आणि गावातील जेष्ट नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.

याप्रसंगी ध्वजारोहण करून निपुण भारत अभियान शपथ व आणि भारताचे पंतप्रधान मा.ना.श्री नरेंद्र मोदी यांचे कल्पनेतील आझादी का अम्रुत महोत्सव या शिलालेखाचे उद्घाटन सरपंच सौ. साधना ताई कुमरे यांचे हस्ते करण्यात आले.

शाळेचे मु. अ. श्री शंकर तलांडे यांनी प्रास्ताविक मधून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सुंदरलाल गेडाम सर  संजय मरापे सर श्री यादव गुरनुले सर यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रम संचलन श्री नितिन गोंडाने सर व आभार श्री संजय मरापे सर यांनी मानले.

अशा प्रकारे विद्यार्थ्यांना स्वादिष्ट पोषण आहार तर ग्रा. पं. कडून जिलेबी देण्यात आले.आणि कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये