ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सावित्रीबाई फुले विद्यालयात सांस्कृतिक महोत्सव संपन्न 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

 सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर व्दारा संचालित सावित्रीबाई फुले विद्यालय / क.महाविद्यालय गडचांदूर येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारीला विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

सर्वप्रथम सकाळी 7.45 वाजता स.शि.प्र.मं गडचांदूरचे अध्यक्ष मा. डॉ. आनंदराव अडबाले यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . याप्रसंगी प्रमुख अतिथि म्हणून संस्थेचे संचालक माजी सभापती नोगराजजी मंगरुळकर, माधवराव मंदे, प्राचार्य संजयकुमार सिंह, प्राचार्या वर्षा खोडके, मुख्याध्यापक धर्मराज काळे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक वासुदेव गौरकर, शाळेचे पर्यवेशक महेंद्रकुमार ताकसांडे हे उपस्थित होते . प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेतील तसेच कनिष्ट महाविद्यालयातील विदयार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम प्रस्तुत केले.

यामध्ये देशभक्तीपर लेझीम,रिमिक्स नृत्य, कोळी नृत्य , आदिवासी नृत्य, संविधानावर आधारित नृत्य ई. चा समावेश होता. कार्यक्रमाचे संचालन प्रा . प्रशांत खैरे यांनी केले तर आभार ज्योती चटप यांनी मानते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुरेश पाटील, भुवनेश्वरी गोपमवार, सुषमा शेंडे, प्रा. सोज्वल ताकसांडे, वासेकर, जि. एन. बोबडे, आडे, किन्नाके, मांढरे, मरस्कोल्हे माधुरी उमरे, प्रा. जहीर यांचे सह सावित्रीबाई फुले इंग्लिश मिडीयम स्कूल – च्या, सर्व शिक्षिका, सावित्रीबाई फुले विद्यालय / क.महाविद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विदयार्थी यांनी कार्यक्रमात सहभाग घेऊन सहकार्य केले. याप्रसंगी पालक, विद्यार्थी, याची लक्षणीय उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये