गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेत शिवारात जुगार खेळ ; आरोपी ताब्यात

एकूण कि 3 लाख 80 हजारांवर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 16/03/2024 रोजी मुखबीर यांचे माहितीवरून जुगार रेड केला असता आरोपी नामे 1)अनिकेत वामनराव गुरुनुले, वय-25 वर्ष, क्र. 2) प्रविण श्रीकृष्ण चौधरी, वय-21 वर्ष, क्र. 3) आकाश गणेश वाघाडे, वय-23 वर्ष, क्र. 4) निखील विठ्ठलराव चचाणे, वय-25 वर्ष, क्र. 5) प्रभाकर नागोराव बावणे, वय-50 वर्ष, सर्व रा. हिंगणी, ता.सेलू, जि.वर्धा नमुद आरोपी हे मौजा हिंगणी शेत शिवारात 52 ताश पत्यावर पैशाचा हारजितचा जुगार खेळत असतांना मौक्यावर मिळून आल्याने सदर आरोपीतांचे ताब्यातून नगदी, मोबाईल, तसेच मो.सा. असा एकूण जु.कि. 3,80,150/- रु. चा मुद्देमाल जप्त करुन नमुद आरोपीतांविरुध्द पो.स्टे. सेलू येथे कलम 12 महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. नुरुल हसन, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. सागर कवडे, मा, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्शनात ठाणेदार सपोनि. तिरुपती राणे पो.स्टे सेलू, पोलीस अंमलदार गणेश राऊत, अखिलेश गव्हाणे, विक्रम काळमेघ, ज्ञानदेव वनवे, होमगार्ड नरेंद्र तेलरांधे, अंगत काळसर्पे यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये