ताज्या घडामोडी

चांदा पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी राष्ट्रीय स्तरावर दाखविणार क्रीडा कौशल्य

किंजल भगत करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपूर, जिल्हा क्रीडा परिषद ,चंद्रपूर व चंद्रपूर शहर महानगरपालिका चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धा दिनांक २९ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२३ रोजी तालुका क्रीडा संकुल, विसापूर बल्लारपूर येथे घेण्यात आले होते. यात चांदा पब्लिक स्कूलच्या किंजल भगत हिने अनेक शाळांच्या स्पर्धकांना मागे टाकत मैदानी स्पर्धा (लांब उडी) राज्य स्तरीय स्पर्धेमध्ये यश प्राप्त करून राष्ट्रीय स्तराकरिता आपले नाव नोंदविले. आहे.

या स्पर्धेत विविध विभागातून १८०० ते २००० विद्यार्थ्यांचा समावेश होता, त्यात नागपूर विभागाचे प्रतिनिधित्व करणारी चंद्रपूरातील वयोगट १४ वर्षा आतील ही विद्यार्थीनी आहे. ही १४ वर्षाआतील मुलगी किंजल प्रेमकुमार भगत राष्ट्रीय स्तरीय स्पर्धेतही महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे.

शाळेच्या संचालिका स्मिता संजय जीवतोडे यांनी नागपूर विभागाचे (चंद्रपूर जिल्ह्याचे ) व शाळेचे नाव लौकिक करावे अशा शुभेच्छा देत तिचे अभिनंदन केले. तर शाळेच्या मुख्याध्यापिका आम्रपाली पडोळे यांनी देखील विद्यार्थिनीला पुढील राष्ट्रीय स्पर्धेत यशाकरिता शुभेच्छा दिल्या, तसेच शाळेचे क्रीडा मार्गदर्शक विनोद निखाडे, अमर कडपेवाले, रमेश कोठारी, जयंती मददेला आणि प्रणोती चौधरी यांनी शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये