ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जागतिक महिला दिनानिमित्त डॉ.नंदिनी भूषण मोरे सन्मानित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

गडचांदूर येथे आधारवेल बहुउद्देशीय संस्थेतर्फे विविध क्षेत्रातील कार्यरत महिलांचा सत्कार समारंभ तथा मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी अर्थ फाउंडेशनच्या संचालिका डॉ.नंदिनी भूषण मोरे यांना वैद्यकीय क्षेत्रातील केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत शाल श्रीफळ देऊन महिला दिनानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून अर्थ फाउंडेशन चे संचालक डॉ कुलभूषण मोरे हे होते.

तर प्रमुख अतिथि गडचांदूर नगरपरिषद च्या नगराध्यक्षा सविता टेकाम महिला व बालकल्याण सभापती निमजेताई नलीनी खेकडे, काळे मॅडम, गोवारदिपे मैडम, टोंगे मैडम, व इतर महिला सदस्य आणि महिला वर्ग उपस्थित होता. डॉक्टर नंदनी मोरे यांनी अर्थ फाउंडेशनच्या माध्यमातून जिवती व कोरपणा या आदिवासी ग्रामीण भागात महिलांच्या आरोग्य बद्दल जनजागृती कार्यक्रम मोफत आरोग्य शिबिर राबविलेले आहेत तसेच ग्रामीण भागातील गावांमध्ये महिलांच्या मासिक पाळी मधील स्वच्छते बद्दल जनजागृती करून इको फ्रेंडली कापडी सॅनिटरी नॅपकिन चा वापर करण्यासंदर्भात सखी स्वराज्य अभियान राबविलेला आहे या अंतर्गत महिलांच्या आरोग्यांमध्ये अमुलाग्र बदल घडून आलेला आहे तसेच विविध आरोग्य शिबिरांद्वारे महिलांना मोफत आरोग्य शिबिर मध्ये मोफत औषधोपचार करतात या त्यांच्या आरोग्य सेवेतील कार्यासाठी महिला दिनाचे औचित्य साधून त्यांना सन्मानित करण्यात आले.

या आयोजित कार्यक्रमात मोफत आरोग्य शिबिरामध्ये 70 महिला रुग्णांची मोफत बिपि शुगर आणि इतर तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचार देण्यात आला व आरोग्याबाबत जनजागृती करण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये