ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रनजीत यादव कोरपनाचे नवे तहसीलदार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

कोरपना येथील तहसील कार्यालयांच्या तहसीलदार म्हणून रंजीत यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते भारतीय प्रशासकीय सेवा ( आय ए एस ) कॅडर चे अधिकारी आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा जिजामाता नगर कराड तर पदवीचे शिक्षण बी टेक राजारामबापू कॉलेज आफ टेक्नॉलॉजी सांगली येथे झाले आहे.त्यांचे मूळ गाव कडेगाव सांगली आहे.

त्यांची कोरपना येथे प्रथमच नियुक्ती असून येथील तहसील कार्यालयाला प्रथमच आयएएस दर्जा असलेले अधिकारी तहसीलदार म्हणून लाभले आहे. त्यांच्या नियुक्तीनंतर कोरपना तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय कामात गती आली आहे. पहिल्याच दिवशी रेती तस्करीवर धडक कारवाई करून तस्करांच्या मुसक्या आवळल्या आहे. सर्वसामान्य जनतेच्या कामालाही वेग आल्याने नागरिकात समाधान व्यक्त होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये