ताज्या घडामोडी

कुजण्याच्या स्थितीतील वृद्धाचा मृतदेह राहत्या घरात आढळला – दुर्गंधी पसरत असल्याने शेजाऱ्यांनी केली होती पोलीस तक्रार वृद्धाचा

मृतक नगर पालिकेचा सेवानिवृत्त कर्मचारी - राजुरा येथिल घटना

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा,

नगरपालिकेतील सेवानिवृत्त कर्मचारी पुंडलिक कोल्हे वय 65 वर्ष ह्यांचा कुजण्याच्या स्थितीतील मृतदेह रविवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी रात्री 12:30 वाजताच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी आढळुन आल्याने खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार राजुरा नगर पालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी पुंडलिक कोल्हे आंबेडकर वॉर्डातील आपल्या राहत्या घरी एकटीच होते. त्यांचे इतर कुटुंबीय नागपुर येथे वास्तव्यास आहेत. रविवारी रात्रीच्या सुमारास शेजारील लोकांना त्यांच्या घरातुन दुर्गंधी येऊ लागल्याने त्यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र सुगावा न लागल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले. राजुरा पोलिसांनी घराचा दरवाजा उघडुन बघीतले असता पुंडलिक कोल्हे पलंगावर मृतावस्थेत आढळले.

प्रेताच्या स्थितीवरून व पसरत असलेल्या दुर्गांधीवरून त्यांचा दोन ते तीन दिवसांपूर्वीच मृत्यु झाला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. घटनास्थळी उपस्थित लोकांपैकी काही व्यक्तींना प्रस्तुत प्रतिनिधीने विचारणा केली असता मृतक शुक्रवार पासुन आढळुन आले नसल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. घटना उघडकीस आल्यानंतर त्यांच्या नागपुर येथिल कुटुंबीयांना कळविण्यात आले आहे. राजुरा पोलिसांनी मर्ग दाखल केला असुन पुढील तपास सुरू आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये