ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपूर येथील अक्षता चरडेला वस्त्रकला स्पर्धेत महाराष्ट्रातून द्वितीय पुरस्कार

चांदा ब्लास्ट

कला संचालनालय महाराष्ट्र राज्य ६३ वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन ठाणे मुंबई येथे विद्यार्थी विभाग पारितोषिक याकरिता महाराष्ट्र राज्यातून चंद्रपूर येथील अक्षता कार्तिक चरडे (शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालय, औरंगाबाद) हिची, महाराष्ट्र राज्यातून २९२३-२४ या वर्षाकरिता वस्त्रकला या विभागात द्वितीय पारितोषिक करिता निवड झाली.

 तिचा बाळासाहेब ठाकरे स्मारक, ठाणे मुंबई येथे नुकताच आमदार संजय केळकर, प्रसिद्ध चित्रकार श्रीकांत जाधव मुंबई, राजीव मिश्रा व प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत अक्षता चरडे चंद्रपूर हिचा प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आला. तिने काढलेली कलाकृती बाळासाहेब ठाकरे स्मारक मुख्य दरवाजावर तसेच कलासंचालनालयाकडून प्रदर्शित करण्यात आलेल्या स्मरणिकेत (२०२३-२४) प्रदर्शित करण्यात आली.

तसेच सभागृहात लागलेल्या प्रदर्शनीतही तिच्या कलाकृतीचा समावेश करण्यात आला. तिने प्राप्त केलेल्या यशाबद्दल आई वडील, नातेवाईक मंडळी,शिक्षक बंधू-भगिनी यांनी अक्षताचे अभिनंदन केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये