ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नविन वर्षानिमीत्य येणारी विदेशी दारू वर्धा डिव्हीजन पथक यांनी केली जप्त

एकुण किंमत 8 लाख 56 हजारावर माल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

उपविभागीय पोलीस अधीकारी कार्यालय, वर्धा येथे दिनांक 24/12/2023 रोजी मिळालेल्या खात्रीशीर खबरे वरून वर्धा उपविभागीय कार्यालयातील पोलीस पथक यांनी यातील आरोपीवर महादेवपुरा, वर्धा येथे महादेव मंदीर जवळ नाकेबंदी करून प्रोव्हीशन रेड केला असता मौक्यावरून आरोपी नामे इमरान सत्तार शेख वय 34 वर्ष रा. रत्नीबाई शाळेच्या मागे, महादेवपुरा वर्धा हा देशी / विदेशी दारूची वाहतुक करतांना मिळुन आला त्याचे ताब्यातुन 1) एक चारचाकी हुंडाई कंपनीची आय – 20 क्र एम.एच. 14 सी.के 3648 सिल्वर रंगाची किंमत अंदाजे 6,00,000/- रू त्या मध्ये रॉयल स्टॅग कंपनिच्या, ऑफीसर चाव्हाईस ब्लु, ऑफीसर चाव्हाईस, टुबर्ग कंपनिच्या बियर, मॅकडॉल न.1 रम, व टॅगों कपंनीच्या देशी दारूच्या अश्या वेग वेगळया कपंनीच्या देशी / विदेशी दारूच्या 892 शिश्या दारू की. की. 2,55,200 रू 2) ए एक itel कपंनीचा साधा मोबाईल 1,000/- रू असा एकुण जु. किंमत 8,56,200/- रू. चा माल अवैध्यरित्या वाहतुक करीत असतांना मिळुन आल्याने जप्तीपंचनामा प्रमाणे जप्त करण्यात आली.

देशी/विदेशी दारू माला बाबत आरोपी यास विचारपुस केली असता आरोपीनी सांगीतले की, देशी/विदेशी दारूचा माल हा कळंब जि. यवतमाळ येथुन आणला आहे. मुकेश जयस्वाल रा. कळंब जि. यवतमाळ, यांनी विदेशी दारूचा माल कंळब येथील खाली जागेवर आणुन दिल्याने आरोपी क्रमांक 2 यांनी त्यांचे बार परवान्याचे उल्लंघन करून वर्धा जिल्हात दारूबंदी असल्यासबंधी माहीती असतांना सुध्दा वर्धा जिल्हातील आरोपीस दारूचा माल देवुन त्यांना सहकार्य केल्याने त्यांचे कृत्य कलम 82, म.दा.का. प्रमाणे होत असल्याने मुकेश जयस्वाल रा. कळंब जि. यवतमाळ यांना आरोपी बनविण्यात आले.

केलेल्या कार्यवाही संबधी पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे आरोपीतांविरूध्द अपराध क्रमांक 1644/2023 कलम कलम 65 अ ई, 77 अ, 82 83, म.दा. का. सहकलम 3 (1) 181, 130/177 मो.वा.का. अन्वये नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पो.स्टे. वर्धा शहर येथील पोलीस अधिकारी क्रर्मचारी करीत आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. नुरुल हसन सा, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री सागर कवडे सा, याचे विशेष मार्गदर्शन व सुचनेप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा, श्री प्रमोद के मकेश्वर सा. याचे सुचनेप्रमाणे, पो.उप.नि परवेज खॉन, यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन मध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाचे पो.हवा. अमर लाखे, पो.शि, मंगेश चावरे, पवन निलेकर, समीर शेख, यांनी यशस्वी रित्या पार पाडली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये